
रविंद्र मैंद
ब्रह्मपुरी शहर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
दिव्यदिव बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी नेहमी आणि सतत सामाजिक, कल्याणकारी व लोकहिताचे उपक्रम राबवीत असते यावर्षी सुद्धा या संस्थेमार्फत डॉक्टर दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मानवी हृदयाच्या स्पंदनाला सर्वप्रथम अनुभवणाऱ्या व त्याच मानवाच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या निमित्याने ब्रह्मपुरी येथील दिव्यदीव बहुउद्देशीय संस्थेच्या च्या वतीने ब्रह्मपुरी येथील सर्व डॉक्टरांना प्रत्यक्षात जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे, सचिव सतीश डांगे, सहसचिव एडवोकेट आशिष गोंडाने, कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे सदस्य संजय बिजवे, मंगेश नंदेश्वर वसुधा रामटेके, नरेश रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.














