
संकेत प.बागरेचा
धुळे तालुका प्रतिनिधी
प्रतिनिधी न्यूज
आमच्या व्हॉटस्ॲप ग्रुपच्या माध्यमातून २५ जून २०२३ रोजी शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजसेवेच्या अंतर्गत १९ वा उपक्रम जिल्हा रायगड अलिबाग येथील परहुर या गावी श्री समर्थ कृपा वृद्धधाम या आश्रमात नीलकमल कंपनीचे ५ कपाट, १५० किलो तांदूळ, ५० किलो गहू, ७५ किलो साखर, ५० किलो कांदे, ५० किलो बटाटे, १५ गाऊन, १५ किलो शिंग तेल, ४५ किलो कडधान्य… इत्यादी गृह उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अनिश गाढवे साहेब शिवसेना प्रवक्ते (शिवसेना एक वादळ), सौ.दीपश्री पोटफोडे ताई महिला जिल्हा संघटीका रायगड, श्री.रुपेश जामकर साहेब विभागप्रमुख, श्री.संदीप पारकर साहेब शहरप्रमुख अलिबाग, श्री.शंकर गुरव साहेब तालुका प्रमुख अलिबाग, सौ.दर्शना पाटील ताई उपजिल्हा संघटीका रायगड, सौ.राखी खरविले ताई शहर संघटीका अलिबाग इत्यादी मान्यवर व ग्रुप मधील ७० ते ८० सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला.














