
राधेश्याम खरात
जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा
प्रतिनिधी न्युज
बुलढाणा- दि 02 जुलै 2023 विदर्भ ट्रॅव्हलच्या रात्री दीड वाजेच्या दरम्यान कल्पने पलिकडच्या भीषण अपघातामध्ये 25 प्रवाशी होरपळून निधन पावले.
त्यांची ओळख पटणे अश्यक्य असले तरी काही मृतदेहाच्या गळ्यातील ताईत, हातातील कडे आणि अर्धवट जळलेली डायरी या वरून 25 पैकी फक्त चार मृतदेहाची ओळख पटली.
त्यामध्ये रा.गोंदळी ता. बाभूळगाव जिल्हा यवतमाळ येथील स्मृतिशेष निखिल पाथे वय वर्ष 23 हा एकमेव बुद्धिस्ट तरुण असल्याने त्यांचा अंतीमसंस्कार बौध्द पद्धतीने व्हावा असा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्यामुळे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते निरंजन जाधव बुलढाणा यांना पाचारण करण्यात आले.
निरंजन जाधव यांनी हा अंतीमसंस्कार धम्म संस्कृती नुसार पूज्य भंते स्वरानंदजी महाथेरो धम्मगिरी महाबोधी बुद्धविहार बुलढाणा यांच्या समवेत विधिवत पार पाडला.
या दुःखद समयी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गिरीश महाजन, बुलढाणा विधानसभा आमदार संजय गायकवाड, चिखली विधानसभा आमदार स्वेताताई महाले, शेतकरी संघटनेचे नेते मा. रविकांत तुपकर तथा जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन मृतकांचे आप्तेष्ट आणि पंचक्रोशीतील प्रचंड शोकाकुल जनसमुदाय दुःखात सहभागी होते.














