
किरण खन्ना
जिल्हा संपादक
चंद्रपूर
बल्हारशाह शहरातील सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक व युवा पत्रकार रोहन जयंत कळसकर यांची सामाजिक बांधिलकी, कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले काम, शहर अध्यक्ष पदावर असतांना केलेले काम पाहून त्यांची मानवाधिकार सहाय्यता संघ बल्हारशाह तालुका सचिव पदी बढती करण्यात आली.
सदर पदोन्नती मानवाधिकार सहायता,संघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोनू सिंग यांच्या आदेशानुसार व बल्हारशाहचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या सूचनेवरून मानवाधिकार सहायता संघ,भारत चे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवी धारणे यांनी केले.
या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी मानवाधिकार सहायता संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत.














