
प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
AEG अकॅडमी महाराष्ट्र संलग्न RC नर्सिंग कलासेस यांचा प्रयत्नाने दिनांक 2 जुलै 2023 रोजी गडचिरोली येथे येत्या काही दिवसात होणाऱ्या आरोग्य भरती साठी मोफत मार्गदर्शन शिबीर चे आयोजन AEG ऍकॅडमी, इंडसइड बँक समोर , चामोर्शी रोड येथे करण्यात आले.
तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांना ताईने कोरोना काळात रुग्णसेवा करत असताना परिचारिका चे योगदान किती मोलाचे होते ते सांगितले. ताईने सांगितले की विद्यार्थ्यांना सुट्टी घेऊन नागपूर, चंद्रपूर येथे कलासेस करिता जावं लागत तेच जर गडचिरोली मध्ये सुरू होत असेल तर आपले विद्यार्थी सर्वांच्या पुढे जातील हे नक्की असेल. यात भर देत मार्गदर्शन शिबीर मध्ये नर्सिंग क्षेत्रातील सर्वोच फ्लोरेंस नाइटिंगेल पुरस्कार राष्ट्रपती यांचा हस्ते 2020 मध्ये गडचिरोलीचे शालिनी कुमरे यांची उपस्थिती व मोलाचे मार्गदर्शन लाभले, तसेच कार्यक्रम चे अध्यक्ष AEG अकॅडमी चे संस्थापक मंगल तेलंग यांनी परिचारिका करिता गडचिरोली येथे राजेश चेडगुलवार यांचा पुढाकाराने सुरू होणारे नर्सिंग कलासेस किती महत्त्वाचे हे समजून देण्यात आले.
गडचिरोलीतील परिचारिका करिता सध्या असलेल्या स्पर्धा परीक्षेत समोर जाण्यासाठी व येणाऱ्या आरोग्य भरती च्या तयारी साठी सरांनी प्रोत्साहित केले. या कार्यक्रम मध्ये गायत्री फँदे मॅडम यांनी गडचिरोली मध्ये नर्सिंग कलासेस किती महत्वाचे हे पटवून दिले. तर RC नर्सिंग कलासेस चे फाऊंडर राजेश चेडगुलवार (ब्रदर) (कंत्राटी) (जिल्हा महिला बाल रुग्णालय) यांनी सांगितले की सुट्टी घेऊन नागपूर जाणे, चंद्रपूर जाणे व त्यात सुट्टी न मिळाल्या मुळे कुठेतरी कमी मार्क्स मिळाले की विद्यार्थी सरकारी नौकरी ला मुकतात तर तस्स होऊ नये करिता पुढाकार घेत गडचिरोली येथे RC नर्सिंग कलासेस सुरू करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांपुढे ठेवले आहे , आणखी चांगल्या प्रतिसादाने क्लास सुरू होतील व नक्की आपले नर्सेस सरकारी नौकरी लागून रुग्णसेवेत रुजू होतील . कलासेस च्या अधिक माहिती करिता 8275723968 वर सम्पर्क करण्याचे आव्हान करण्यात आले . शेवटी आभार व्यक्त करत कार्यक्रम ची सांगता करण्यात आली .
ताई सोबत चर्चा करत असताना बाबा धर्मराव आत्राम हे मंत्री मंडळ मध्ये असतील व ती खुशी ताईंना आवरली नाही आणि त्यांनी तिथल्या मोठ्या TV वर लाईव्ह शपथ ग्रहण समारोह बघत बसल्या व आनंद व्यक्त केले. धन्यवाद व आभार करीत ताईने निरोप दिला.














