prabodhini news logo
Home ठळक बातम्या पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून बापाला मुलाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

पेन्शनचे पैसे दिले नाही म्हणून बापाला मुलाकडून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
46

स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भद्रावती- बापाने आपल्या पेन्शन मधील पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात मुलाने आपल्या बापाला मोगरी व दगडाच्या सहाय्याने जीवनाशी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भद्रावती शहरातील अहिल्यादेवी नगर येथे दिनांक 1रोज शनिवारला घडली.
http://www.prabodhininews.com/?p=26345
या घटनेत बाप गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात व नंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी सुरज गुलाब दाते याला अटक केली आहे. गुलाब लक्ष्मण दाते वय 72 वर्षे हे शहरातील अहिल्यादेवी नगरात राहतात. त्यांचा मुलगा सुरज दाते हा त्यांना नेहमी पेन्शनचे पैसे मागायचा मात्र त्याचे वडील गुलाब दाते हे त्याला पेन्शनचे पैसे देण्यास नकार देत होते. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. घटनेच्या दिवशी आरोपी सुरज दाते याने आपले वडील गुलाब दाते यांना पेन्शनचे पैसे मागितले असता त्यांच्यात वाद झाला.
http://www.prabodhininews.com/?p=26337
त्यानंतर गुलाब दाते हे झोपून असताना मुलगा सुरज याने लाकडी मोगरी व दगडाच्या साह्याने त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी सुरज दाते याला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
http://www.prabodhininews.com/?p=26355

http://www.prabodhininews.com/?p=26352

http://www.prabodhininews.com/?p=26349

http://www.prabodhininews.com/?p=26340

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here