prabodhini news logo
Home ठळक बातम्या मोबाईलद्वारे करता येणार विविध पिकांची नोंदणी.

मोबाईलद्वारे करता येणार विविध पिकांची नोंदणी.

0
63

कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही

ई. पीक पाहणी आता मोबाईल अॅपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकन्यांनी स्थानिक तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबाऱ्यावर विविध पिकांची नोंदणी करता येणे आता शक्य झाले आहे.

महसूल विभागाचा ई पीक पाहणी प्रकल्प १५ आगष्ट २०२१पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी

नोंदणीसाठी ई पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष इ पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी 1जुलैपासून सुरू करण्यात येत आहे. त्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, असे आवाहन ई – पीक पाहणी समन्वय श्रीरंग तांबे आणि सिंदेवाही तहसीलदार योगेश शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here