
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्वच्या वतीने भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा व भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा सिन्देवाही यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यकर्ता धम्म चिंतन शिबीराचे आयोजन दि.9 जुलै 2023 ला सकाळी 10.30.वाजता पासून ते 5.00 वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृह ,सिंदेवाही येथे करण्यात आले आहे.
कार्यकर्ता धम्म चिंतन शिबीराचे मुख्य मार्गदर्शक आद. बि. एच
गायकवाड ,राष्ट्रीय सचिव मुंबई राहाणार असुन मुख्य अतिथी म्हणून आद. अशोक घोटेकर आहेत .शिबीराचे उद्घाटन डॉ. राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व करणार असून शिबीराचे अध्यक्ष आद.अशोक रामटेके उपाध्यक्ष संस्कार विभाग हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश मानकर सरचिटणीस, घनश्याम भडके कोषाध्यक्ष, लोमेश खोब्रागडे उपाध्यक्ष, नरेंद्र पाटील उपाध्यक्ष, विजयाताई रामटेके उपाध्यक्ष महिला ,डॉ .रवींद्र शेंडे संघटक , प्रा .जगदिश सेमस्कर सरचिटणीस , अंबादास कोसे उपाध्यक्ष, एन .आर. कांबळे व संपूर्ण तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत .
तरी होणार्या या कार्यक्रमास संपूर्ण जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी, केंद्रीय शिक्षिका, केंद्रीय शिक्षक, बौध्दाचार्य, सैनिक, महिला उपासिका, यांनी आर्वजुन उपस्थित राहावे असे आवाहन डॉ .राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व यांनी कळविले आहे.














