
भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्यूज चॅनल
बहुजन समाज पक्ष भंडारा विधानसभाची बैठक दिनांक 07 जून २०२३ रोजी भंडारा येथील विश्रामगृहावर संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य प्रभारी भीम राजभर आणि महाराष्ट्र राज्य प्रभारी एवम नागपुर सेक्टर इंचार्ज माननीय एडवोकेट सुनील डोंगरे साहेब सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि गेल्या महिन्यातील कामाचा आढावा घेतल्या.
महाराष्ट्र राज्य प्रभारी भीम राजभर यांनी भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि ओबीसी जनगणना आदी समस्यांबाबत जनतेला जागरूक करून देण्याचा निर्देश कार्यकर्तानां दिला.
एडवोकेट सुनील डोंगरे यांनी कोतवाल व पोलीस पाटील भरतीतील घोटाळ्यांचा बहुजन समाज पक्षाने निषेध करत समाजातील बेरोजगारी व अत्याचाराकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप केला.
तसेच परिका रामटेके यांनी बहुजन समाज पक्षाची विचारधारा आणि कार्याने प्रभावित होऊन बहुजन समाज पक्षात प्रवेश केला.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश सचिव दिलीप मोटघरे,प्रदेश सचिव जय मेश्राम , प्रदेश सचिव शंकर भेंडारकर,जिल्हा प्रभारी चंद्रमणि गोंडाने, जिल्हा प्रभारी सूरजभान चौहान, जिलाध्यक्ष पाम्बीर्द, उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, जिला महासचिव डॉ ए पी के संघरत्ने, कोषाध्यक्ष रविंद्र गजभिये,संगठन मंत्री पुरुषोत्तम सहारे, जिला कार्यकरिणी सदस्य उमराव शेलोकर, तुलसीराम शेन्डे, कृष्णा गजभिये, ,यशवंत वैद्य, संजय नासरे, भंडारा विधानसभा अध्यक्ष नितिन राउत, विक्रांत भवसागर, उषा कांबळे, संजय भिवगुडे, सुनिता गोंडाने, परीका रामटेके, डॉ भैया लाल मेश्राम, शुक्राचार्य डोंगरे, दीपक कुमार माने, नरेंद्र रामटेके, रतन सुखदेवे, लोमेश चव्हाण, सुनील शिउरकर, अमित तिरपुड़े, अमित रामटेके, देवा शेन्डे , रविंद्र गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.














