prabodhini news logo
Home ठळक बातम्या नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाची मदत पांडुरंग नागपुरे यांच्या हातावरील कॅन्सर शस्त्रक्रिया...

नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाची मदत पांडुरंग नागपुरे यांच्या हातावरील कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वी

0
50

भंडारा जिल्हा प्रतिनिधी
नरेश गजभिये लाखांदूर
प्रबोधिनी न्यूज चॅनल

पांडुरंग नागपुरे हे अनेक दिवसापासून कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते, परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते त्यानंतर त्यांनी नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाशी संपर्क करून शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली त्यानंतर त्यांना नानाभाऊ पटोले रुग्ण सहायता कक्षाच्या वतीने नागपूर येथील #खाजगी #रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले व त्यांची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली…अवघड समजली जाणारी हातावरील शास्त्रक्रिया नागपूर येथील डॉक्टर यांनी यशस्वी केली आहे गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवणी येथील पांडुरंग नागपुरे यांची प्रकृती या शास्त्रक्रियेनंतर ठणठणीत आहे. त्यांना रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. मोफत शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल पांडुरंग नागपुरे व त्यांच्या परिवार यांनी नानाभाऊ पटोले रुग्णसहायता कक्षाचे धन्यवाद मानले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here