
राहुरी प्रतिनिधी. शिवाजी दवणे
राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे औटी वस्तीवर राहात असलेले बाळासाहेब औटी यांच्या घरात रात्री त्यांची पत्नी व 5 वर्षाची नात झोपलेली असताना तीन च्या दरम्यान घरात चार ते साडे चार फूट लांबीच्या नागाने प्रवेश केला काही वेळाने आजीला नात घोरत आहे असं वाटले व त्यांनी डोळे उघडून बघितले असता तो नातीच्या घोरण्याचा आवाज नसून नागाचा फुत्कार असल्याचे समजले व आजीने आरडा ओरडा करत आपल्या नातीला घेऊन बाहेर पळ काढला.. त्यावेळी घरातले इतर सदस्य जागे झाले व त्यांनी ताबडतोब राहुरी येथील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना मध्यरात्री फोन करून घटनेची कल्पना दिली एवढ्या रात्री सुद्धा सर्पमित्र पोपळघट यांनी औटी कुटुंबाला धीर दिला व नागाला पकडण्यासाठी ते निघाले.. तिथे जाऊन काही वेळातच सर्पमित्र पोपळघट यांनी नागाला पकडून आपल्या ताब्यात घेतले व औटी कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.
आजीच्या तत्परतेने सुदैवाने रात्री झोपेत होणारा मोठा अनर्थ टळला..
एवढ्या रात्री देखील येऊन नागाला पकडल्यामुळे औटी कुटुंबाने सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांचे आभार मानले..














