
रविंद्र मैंद ब्रह्मपुरी शहर प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज चॅनल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर लक्ष वेधण्यासाठी एकदा मतदान केले की मतदारांना पाच वर्षे गृहीत धरत असल्याने तसेच राजकारणाचा चिखल होत असल्याने ‘ एक सही संतापाची ‘ ही मोहीम राबवण्याचा प्रारंभ आज दिनांक ९ जुलैला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे करण्यात आला.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष सुरज भाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पदाधिकारी यांनी संताप जनक सहीची मोहीम राबवण्यात आली त्याला सामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय पारडवार , तालुकाध्यक्ष सुरज भाऊ शेंडे ,मंगेश पाटील, गंगाधर ढोरे, विलास आंबोने, विहार मेश्राम , जितू गणवीर, सुनील झाडे ,दीपक मेहर, सुनील कुंभारे, हरीश हटवार, गुड्डू तन्नेवार , मनोज शंभरकर वैभव नागवेवते , कैलास कांबळी , मुरली नखाते ,पवन रुईकर , प्रफुल लोखंडे तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक नवनिर्माण सैनिक उपस्थित होते.














