prabodhini news logo
Home ठळक बातम्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या निषेधात मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान

महाराष्ट्रात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या निषेधात मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ अभियान

0
55

स्वप्निल रा. मोहितकर
भद्रावती तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

महाराष्ट्रात सुरु असलेल्या गढूळ राजकारणाच्या पार्श्व भूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही संतापाची हे अभियान शनिवार दि ८ जुलै व रविवार दिनांक ९ जुलै रोजी महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे। याच पार्शवभूमीवर भद्रावती येथील जुना बस स्टॅन्ड डॉ। बाबा साहेब आंबेडकर चौकात मनसे शहर अध्यक्ष युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात सादर उपक्रम राबवण्यात आला।यावेळी जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , महिला वर्ग तसेच मा नगराध्यक्ष ज्ञानेश्वरजी डुकरे यांनी सहभाग घेतला। तसेच तालुका उपाध्यक्ष महादेव वरखडे, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष मंदा वरखडे, महिला सेना शहर अध्यक्ष विभा ताई बेहेरे, सुनीता खंडळकर, सुहास झाडे, अभी उमरे,पंकज ताजने, निखिल उगे, अश्विन सहारे,अप्पू मंडवगडे, सहील वालदे, रोहित मेश्राम, ओम झाडे, महेश सिदाम, सोनु कुचेकर,प्रथम टिकले इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here