भटाळी वेकोलीतील कावेरी कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार न दिल्यामुळे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

0
38

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुर्गापुर ग्राम पंचायत उपसरपंच तथा शोषित भारत जनरल मजदूर यूनियनचे, सचिव प्रज्योत पुणेकर व सामाजिक कार्यकर्ते नंदु इगळे यांच्या नेतृत्वात महेश पारखी व इतर कामगार बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरु केल्याची माहिती मिळताच, मी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी व शिवसेना चंद्रपुर तालुका संघटक, संजयकुमार शिंदे यांनी भेट देवून विचारपूस केली असता “वेकोली भटाळी ओपन कास्ट माईन्स अंतर्गत कार्यरत M/S कावेरी कंपनीमध्ये येथील स्थानिकांना दि. 07 नोव्हेबर 2023 पर्यंत रोजगार न दिल्यामुळे दि. 08 नोव्हेबर 2023 रोज बुधवारला बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरु केल्याची सविस्तर माहिती दिली.” त्याअनुसंगाने सदर मागणी रास्त असून या संदर्भात तात्काळ निर्णय घेवून अन्नत्याग उपोषण मागे घेण्यास जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी. अशा प्रकरणामुळे आमच्या (शिंदे सरकार) पक्षाचे नाव ख़राब होत असल्याने आम्ही स्वतः याची जातीने दखल घेवून सदर प्रकरण शिवसेनेचे चंद्रपुर जिल्हा प्रमुख मा. नितिन मत्ते यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांना सदर बाब निदर्शनात आणून देवून न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही आमरण उपोषणकर्त्याना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here