डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर- कालवा अधीक्षक शारदा दामोदर पुंडे (24) राहणार नवेगाव (धुसाळा) तहसील मोहाडी जिल्हा भंडारा. शारदा जी आपली स्कुटी ने नवेगाव ते तिरोडा जाण्यासाठी निघाले असता सरांडी गावाजवळ समोर ट्रक जात होते आणि शारदा जी ट्रक चा मागे आपल्या स्कुटी ने जात असताना अचानक ट्रक नी ब्रेक मारला शारदा जी ट्रक चा मागेवुन फार जोराने धडकल्याने डोक्याच्या भारा वर आपटले आणि गंभीर जखमी झाले होते. प्रत्यक्ष दरशी लोकांनी त्यांना ताबडतोब तिरोडा सरकारी दवाखान्यात नेले पण डॉक्टर नी त्यांना मृत घोषित केले. शारदा जी तिरोडा पाटबंधारे विभाग मध्ये कालवा अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आई-वडील शेतकरी आहेत पण मोठा भाऊ पोलीस निरीक्षक चंद्रपूर, दुसरा भाऊ काश्मीर मध्ये सेना दल मध्ये आहे. मोठी बहीण तलाठी पदावर कार्यरत आहे. अत्यंत दुःख व्यक्त करीत सर्व लोकांनी शोक प्रगट करीत आहे.हि घटना 21/5/2025 ला सकाळी 10 वाजता ची आहे.

