सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सावली तालुक्यात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र मान.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आदिवासी बिहूल भागातील गावात दिवाळी निमित्याने फराळाचे व साहित्याचे वाटप करण्यात आले. जनसेवा हिच ईश्वर सेवा याचे व्रत माणून मा.विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमी जनसेवेच्या कामात तत्पर असतात.दिवाळी सण सर्व घरात साजरा व्हावा या उद्देशाने आदिवासी गावात फराळ व कापडाचे साहित्य वाटप करण्यात आले.संपूर्ण आदिवासी वस्तीचे सावली तालुक्यातील सादागड,सादागड हेटी,मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड,भानापूर,जनकापूर या गावात प्रत्येक कुटुंबाला दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आले.
यावेळी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितिन गोहने,भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष मा.विजय कोरेवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मान.विजय मुत्यालवार,सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,नगरसेवक मा.प्रफुल वाळके, नगरसेवक मा.सचिन सांगिडवार, ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे, बाजार समितीचे संचालक मा.खुशाल लोडे,चारगावचे उपसरपंच मा.राजू वलके,मा.यशवंत ताडाम, मा.श्रीकांत बहिरवार,मा.राजू बुरीवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.राजू कंचावार, मा.शरद मडावी,मा.अनिल कुळमेथे, मा.प्रकाश वेटे, मा.मिनेश मडावी, मा.अशोक दलांजे, मा. वैभव गुज्जनवार,मा.हेमंत धुर्वे, मा.सुशील डहलकर, मा.अशोक अलाम,मा.विठ्ठल मंगर,मा.यश गेडाम उपस्थित होते.

