वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
टी. जी. फाउंडेशन चे संस्थापक व शासकीय ई- निविदा सल्लागार टेंडरगुरु मा. हर्षद बार्गे यांनी सी पी पी एल कार्यालयास शुभेच्छा भेट दिली, शासकीय निविदा विषयी मार्गदर्शन देखील केले. GEM portal द्वारे अनेक टेंडर उपलब्ध आहेत, शासनाच्या अखत्यारीत पात्र कंपनी धारकांना सदर टेंडर व योजनांचा लाभ घेता येऊ शकतो असे ते म्हणाले. निविदा प्रक्रिया विषयी माहिती दिली.
निविदा भरतांना घ्यावयाची काळजी व ठळक मुद्दे यावर प्रकाश टाकला. सी पी पी एल चे संचालक डॉ. सागर चोथवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, प्रसंगी आपलं महानगर चे निवासी संपादक हेमंत भोसले, अरुण भामरे, सुनीता चव्हाण, लिला सोनवणे आदी उपस्थित होते.

