युवा नेते दिवाकर निकुरे यांची मागणी
सोनाली कोसे
नागभीड तालुका प्रतिनिधी
नागभीड तालुक्यातील सोनापूर हे महत्वाचे एक गांव आहे. या ठिकाणी विदर्भातील प्रसिद्ध असलेले सात बहिणीचे डोंगर हे याच गावात वसलेले आहे. परंतु इथं बससेवा अभावी आहे,येथील बरेच विद्यार्थी नागभीड येथे शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात,तसेच स्थानिक व आजूबाजूच्या गावातील नागरीक सुद्धा आपल्या वैयक्तिक, तहसील व आर्थिक देवाण-घेवाण नागभीड येथे सतत चकरा मारावे लागतात.
या सर्व बाबींचा गांभीर्यानं विचार करून त्वरीत नागभीड ते सोनापूर बससेवा सुरू करून येथील नागरिकांना व विद्यार्थांना दिलासा द्यावा अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.

