गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
सावंगी ता. देसाईगंज (वडसा) येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात योग्य दर मिळत नसल्याबद्दल व केंद्र शासनाने जाहीर केलेले आधारभूत मूल्य रुपये 2,183 शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याबद्दल सांगतानाच जर उत्पादन खर्च भरून निघायचा असेल तर केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत मूल्या व्यतिरिक्त राज्य शासनाने प्रतिक्विंटल रुपये 700 बोनस घ्यावा अशी मागणी करून शेतकऱ्यांनी याविषयी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सोबत वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले उपस्थित होते.

