17 नोव्हेम्बर ला कंत्राटी अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर

0
77

शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन क्रुती समिती जिल्हा चंद्रपूर चे वतीने दिनांक १७ नोव्हेंबर२०२३ला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा चे आयोजन केले आहे.
गेल्या अठरा अठरा वर्षी पासून अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पध्दतीने काम करत आहे. कोरोना काळात अनेक महत्त्वाचे काम या लोकांनी केले असून जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत सरकारला जागतिक पुरस्कार मिळाला.
तरीही येथील शासनाने आमचा छळ लावला आहे , अशी भावना आज आरोग्य विभागातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाटत आहे. हि वस्तूस्तिथी असून या सरकारने कंत्राटी कर्मचारी यांना समायोजन करुन कायम स्वरुपाची नोकरी द्यावी. व ज्या कोणत्या अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन करता येत नाही. त्यांना समान काम समान वेतनवाढ द्यावी.
सरकारने आमच्या समायोजन क्रुती समितीला लेखी पत्र दिले होते. कि मार्च २०२३ पर्यंत सर्वांना समायोजित करण्यात येईल परंतु सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी हा बेमुदत संपावर गेला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ला चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम आरोग्य विभागातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालावर धडक मोर्चा चे आयोजन केले आहे. असे रविंद्र उमाठे मुख्य समन्वयक यांनी कळविले आहे.
तसेच या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन काँ प्रकाश रेड्डी, अंकुश वाघमारे, पि एम. गोटे, डॉ शिल दुधे, डॉ. तुषार अगडे, डॉ. अक्षय बुरलावार, वनिता मेश्राम, ललिता मुत्यालवार, आराधना झाँ, शालिनी वनकर ,जया मैदंळकर,रोशना एटलावार, मंदा बनकर, डॉ. तिरथ उराडे, डॉ. विनोद फुलझेले, सूरज डुकरे, डॉ. प्राची रोडे यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here