प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो.
चिकोडी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
चिकोडी – दि. 16 नोव्हेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरी आर के फाउंडेशन व देसाई मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील माध्यमं या विषयावर प्राध्यापक श्रीयुत प्रकाश देसाई यांचे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता याविषयी व्याख्यान झाले, आणि सदलगा शहर व परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने नैतिक निरीक्षक संस्था म्हणून काम करायला सुरुवात केली, जेणेकरून माध्यमांचा उच्च दर्जा राखला जावा आणि कोणत्याही प्रभावाशिवाय निपक्षपातीपणाने पत्रकारितेचे काम सुरू राहावे हा यामागील उद्देश होता. असे यावेळी देसाई यांनी सांगितले.
या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सदलगा शहरातील निवृत्त प्राध्यापक प्रकाश देसाई, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, पत्रकार अनंत दीक्षित, शितल कुडचे, अमर माने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पिसाळ, सदलगा पूर्व भाग पि के पी एस चे संचालक बंडा तपकिरे, प्रगतिशील शेतकरी सदानंद मुतनाळे, सुरेश बडगेर, अण्णाप्पा खेबुडे इत्यादी मान्यवरासह अनेक नागरिक उपस्थित होते.

