गडचिरोली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मौजा कोसरी ता. आरमोरी येते ग्रामवासियांच्या वतीने ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करूण्यात आले, या सप्ताहाचे उदघाट्न गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते संम्पन्न झाले.
भागवतात सप्ताहात सांगण्यात येणाऱ्या कथा, राष्ट्रसंताचे विचार आणि विविध प्रसंगातून अनेकांना आयुष्य जगण्याचा बोध मिळतो, त्यामुळे मनाची शांती तर होतेच सोबतच अश्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाणे गावात एकीचे आणि प्रसन्नतेचे वातावरण सुद्धा निर्माण होत असतो असे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी आपल्या उदघाट्नीय भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हूणन माजी आमदार आनंदराव गेडाम, सहउदघाट्क म्हूणन जि. प. चे माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, माजी सभापती विश्वास भोवते, स्वप्नील ताडाम, अंकुश गाढवे, दिगेशवर धाईत, सह मोठ्या संख्येने गावातील नागरीक यावेळी उपस्थित होते.

