लखाड जवळील घटना
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिन न्युज,अमरावती
अमरावती : जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी) येथील आकोट ते अंजनगाव महामार्ग वर लखाड, समोरील पुला जवळ ट्रक ने धडक देऊन सात बकऱ्या केल्या ठार सकाळी साडेसात च्या दरम्यान ची ही घटना आहे. चालक ट्रक सह पसार लखाड येथील रमेश शंकरराव लबडे व गौतम भीमराव लबडे यांच्या मालकीच्या सात बकऱ्यांना जागीच ठार केले असून दोन बकऱ्या गंभीर जखमी झाले. सदर व्यक्ती गरीब मजूर आहेत.याच्यावरच त्यांचा व परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात. सकाळी बकऱ्या घेऊन चराई करिता सातेगाव फाट्याकडे जात असतांना हायवे रोड क्रमांक सहा हसनापूर लोखंड कारखान्या जवळ या ट्रकने या बकऱ्याना चिडले, ट्रक क्रमांक एमपी 20 एच बी 87 72 आयशर ट्रक हा घटनास्थळा वरून सुसाट वेगाने पसार झाला, ट्रकचा पाठलाग करत तेथे हजर असलेल्या नागरिकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांना तो कावे मारत असल्याने हाती लागू शकला नाही, संबंधित पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी त्याचा फोटो नंबर प्लेट चे फोटो घेण्यात यश मिळविले रस्त्याने एकूण 15 बकऱ्या चरोईसाठी जंगलात जात होत्या, त्या मधील सात बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन बकऱ्या ह्या गंभीरित्या जखमी आहेत, त्या मुळे या गरीब मजुराचे जवळपास ५० ते ७० हजार पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार प्रकाश अहिरे, अंजनगाव सुर्जी यांनी पीएसआय मीना पंडे , यांना घटनास्थळावर चौकशी करिता रवाना केले होते ट्राफिक हवालदार राजेश कासदेकर, पवन बडोदकर,प्रमोद सरोदे, यांनी घटनास्थाळी चौकशी करून घटनेचा पंचनामा केला, घटनास्थळी चांगलीच गर्दी पहायला मिळाली मृत्युमुखी झालेल्या पशुधन बकऱ्या यांची वैद्यकीय तपासणी सुरू होती, मजूर मूळ पशुधन मालक ढसाढसा रडत होते. त्यांचा पण या अपघातातून जीव वाचला त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे ,फरार झालेल्या ट्रक चालका वर अंजनगाव पोलिसात ठाण्यात भारतीय दंड संहिता१८६० कलम ४२९,२७९ नुसार गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध अंजनगाव पोलीस घेत आहेत पुढील तपास ठाणेदार अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सौ मीना पंडे, मॅडम करीत आहेत.

