अँड. वंदना कावळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर – ज्या समाजात आम्ही जन्मलो त्या समाजाचे उतराई होण्यासाठी समाजऋण म्हणून सेवा देण्याचे नैतिक कर्तव्य असून समाज सेवा बांधिलकी म्हणून स्वीकारल्यास जीवन सुसह्य होतंय असे मौलिक मार्गदर्शन समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांना हितोपदेश करताना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांनी प्रतिपादन केले ते विकलांग सेवा संस्था येथे एस आर एम कालेज आफ सोशल वर्क चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचा NGO भेट कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव देवराव कोंडेकर, कार्यक्रम समन्वयक प्रसाद पान्हेरकर, युवा कार्यकर्ती अंकिता दुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध उपक्रम व कार्याबद्दल महत्वपुर्ण माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आकांक्षा गावतुरे यांनी केले तर सहकार्य सीमा दुपारे, राजश्री शिंदे,शिवानी बोबडे, नितीन राव, खुशाल ठलाल यांनी सहकार्य केले.

