राजे साहेबांनी स्वतः मोबाईलवर बोलून तातडीने आर्थिक मदत केल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर.
अहेरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
अहेरी तालुक्यातील तुमिरकसा गावातील कुमारी मनीषा बिच्छू आत्राम वय 26 या मुलीचे छातीत पाणी भरल्याने छातीवर दुखणे व श्वास घेण्यास अडचण असा गंभीर आजार असल्याने त्या रुग्णाला नागपूर येथील एम्स हॉस्पिटलला पाठविण्यास तज्ञ डॉक्टरांनी सांगितले होते. रुग्ण कुमारी मनीषा आत्राम हिला नागपूर येथे नेण्याकरिता मोठा आर्थिक खर्च लागत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीचे होते पण त्या रुग्णाला उपचार करणे अत्यंत आवश्यकता असल्याने सदर रुग्णाची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना माहिती देण्यात आले, माहिती मिळताच राजे साहेबांनी स्वतः त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना मोबाईलवरून संपर्क साधून रुग्णाची माहिती घेतली आणि विलंब न करता रुग्णाला गावापासून ते नागपूर येथील रुग्णालयापर्यंत लागणारा संपूर्ण खर्च राजे साहेब कडून देण्यात आले. तसेच उपचारात काही अडचण आल्यास निसंकोच संपर्क साधावा असेही राजें साहेबांनी सांगितले.
राजे साहेबांच्या या सहकार्यामुळे रुग्णाचा कुठुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. आणि राजे साहेबांना मनापासून धन्यवाद देत आशीर्वाद दिले. दानशूर राजे साहेब यांच्या या स्वभावामुळे क्षेत्रातील जनतेचा मनात घर करुन बसले आहे. आणि दिवसेंदिवस त्यांची प्रचिती जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढतांना दिसत आहे..!!

