सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर
भारतीय कृषक समाज नवी दिल्ली यांच्या पदाधिकारी ना हिरवे यांचे मार्गदर्शन
आज भारतीय कृषक समाज नवी दिल्ली च्या पदाधिकारी यांची महाराष्ट्र राज्य चे प्रभारी ज्योती सुरसे यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी विद्यापीठात मंथन बैठक पार पडली बैठकीची सुरुवात विद्यापीठाच्या गाण्याने केली मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून झालीया बैठकीत कृषी तज्ञ रमेश हिरवे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हिरवे साहेब म्हणाले की शेतकरयांनी आता व्यापारी होणे काळाची गरज आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटीत पद्धतीने उत्पादन प्रक्रिया व विपणन करणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी गट उत्पादन गट स्वयं सहाय्यता गट शेतकरी उत्पादक कंपन्या बनुन एकमेकांच्या सहाय्याने कृषी विद्यापीठ च्या सहकार्याने कृषी विभागाच्या अर्थ सहाय्याने कृषी उत्पादन प्रक्रिया सामुहिक सुविधा केंद्र व पणन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफ्याची शेती करावी
यावेळी भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुभाष नलांगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व जिल्हाचे महीला व पुरुष जिल्हा अध्यक्ष व तालुका निहाय कार्यकारिणी उपस्थित होते.

