अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती (दर्यापूर) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांनी १० नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे गावगाड्यांची गती मंदावली आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून ऑनलाईन दाखले,उतारे देण्यासह अन्य कामकाज ठप्प झाले आहे.या आंदोलनाचा परिणाम ग्रामपंचायतींच्या कारभारावर होत आहे.तातडीची कामे ग्रामसेवकांना करावी लागत आहेत.जवळपास एक महिना होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा न निघाल्याने ग्रामपंचायतमधील संगणक शटडाऊनच आहेत.यामुळे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्या आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणजेच आमदारांच्या घरासमोर आंदोलन.
मागील १२ वर्षांपासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पात काम करून डिजिटल महाराष्ट्र साकारणाऱ्या राज्यातील हजारो संगणक परिचालकांनी प्रलंबित मागण्यांकरिता काम आंदोलन पुकारले आहे.संगणक परिचालक हे ग्रामपंचायतीने ठरवून दिलेली कामे अखंडित पार पडतात. ग्रामपंचायत प्रशासन देखील संगणक परिचालकांच्या वेतनाविषयी लक्ष देत नाही. संगणक परिचालकांचे हक्काचे मानधन वर्ष वर्ष मिळत नाही.त्यामुळे संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संगणक परिचालक हे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व २९ प्रकारचे दाखले ऑनलाइन देणे, १ ते ३३ नमुने ऑनलाइन करणे, शेतकरी कर्ज माफी योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, अस्मिता योजना, राज्यातील घरकुल योजनेचे सर्वेक्षण यासह गावातील ग्रामसभा, मासिक सभा ऑनलाइन करणे, रहिवासी, बांधकाम परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, नमुना नं. ८, आयुष्यमान भारत, पीएम विश्वकर्मा आदी कामे ग्रामपंचायत संगणक परिचालक यांच्याद्वारे केली जातात.
संगणक परिचालकांना ६ हजार ९०० हजार रुपये असे तुटपुंजे मानधन मिळते. एक वर्ष ते दीड वर्ष हक्काचे मानधन मिळत नाही. हेच का आपले सरकार, अशी म्हणण्याची वेळ संगणक परिचालकांवर आलेली आहे.यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळेपर्यंत २० हजार मासिक मानधन देणे,टार्गेट पध्दत चुकीची असून,ती तत्काळ रद्द करणे,सर्व संगणक परीचालकाचे एकूण थकित मानधन एकत्र खातेवर जमा करणे, या प्रमुख मागणीसह कामबंद आंदोलन सुरूच राहील.करिता यावेळी दर्यापूर विधानसभा आमदार बळवंत वानखडे यांच्या घरासमोर ग्रामपंचायत संगणक परिचालक यांनी आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन सोपविले.
शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सदार,उपाध्यक्ष अमित कुकडे,तालुका कार्याध्यक्ष श्रीकांत मुर्हेकर,सचिव योगेश ना,तालुका सहसचिव लुकेश राऊत,कोषाध्यक्ष शाम का,तालुका संपर्कप्रमुख वैभव ओलंबे,संघटक पपेश पाठक,मार्गदर्शक जायले मॅडम व इतर यांनी केले.

