पानपिंपरी विशेष बाब म्हणून तरतूद करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती – जिल्ह्यातील (अंजनगाव सुर्जी ) इथे गेल्या पाच दिवसा पासून महाराष्ट्र सहीत अंजनगाव सुर्जी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या सततच्या चक्रामुळे तालुक्यातील पानपिंपरी औषधी पीक व कापूस, तूर, कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी भाजपाचे वतीने मुख्यमंत्री, पालकमंत्री, खा. बोंडे, यांना तहसीलदार ह्यांचे मार्फत निवेदन देण्यात आले होते, त्या निवेदनाची खासदार अनिलजी बोन्डे ह्यांनी तडकाफडकी दखल घेऊन जिल्हाधिकारी सौरभ काटियार, जिल्हा कृषी अधिकारी यांना गंभीर बाबीबाबत अवगत केले.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकविल्या जाणाऱ्या पान पिंपरी ह्या औषधी पिकाचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले, पानपिपरी ह्या औषधी पिकाचे भरवशावरच ह्या भागातील शेतकऱ्याचा उदर निर्वाह चालतो. या पिकाचे झालेल्या नुकसानबाबत त्वरित सर्वेक्षण, पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पानपिंपरी, कापूस, तुर, कांदा उत्पादक शेतकरी व भाजपाचे वतीने निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाची खा. बोन्डे ह्यांनी तडकाफडकी दखल घेऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसान ग्रस्त पान पिपरी, कापूस, तूर, कांदा, संत्रा, पिकाची विदारक परिस्थिती पाहली असता बोंडे यांनी त्वरित जिल्हाधिकारी सौरभ काटियार, जिल्हा कृषी अधिकारी ह्यांना ह्या गंभीर बाबी बाबत अवगत केले. तसेच सततच्या नुकसान ग्रस्त पानपिपरी ह्या पिकाची विशेष बाब म्हणून तरतूद करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची तरतूद करून द्यावी असे सूचित केले. पाहणी करतांना खा. बोंडे, माजी आमदार रमेश बुंद्रीले, तहसीलदार पुष्पा सोळंके, दाभेराव, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका कृषी अधिकारी राजाभाऊ तराळ, मंडळ अधिकारी पिंपळकर, राजकुमार गवई, माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. विलास कविटकर, शहराध्यक्ष उमेश भोंडे, तालुक्का अध्यक्ष रवी गोळे, सरपंच योगेश नेमाडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, भाजपा प्रभारी मनीष मेन, शेतकरी रविद्र बोडखे, मधुकर गुजर, दिलीप भोपळे, नितीन पटेल, मनोहर भावे, नंदकिशोर आबंडकर, गोविंद भावे, संदीप येऊल, प्रतीक बोडखे, सुभाष थोरात, संजय नाठे, राजेंद्र रेखाते, हर्षल पायधन, ओबीसी मोर्चाचे रितेश आवडकर, गौर्व चांदुरकर, प्रवीण टाले, विक्रम पाठक राजेंद्र पाटील, सुनील माकोडे, संजय टिपरे, आशिष टिपरे, प्रवीण पाटुकले, मनोज श्रीवास्तव, सुधाकर टिपरे, गणेश पिंगे, दिगंबर भोंडे, सचिन गुरव, किसान आघाडीचे रतन भास्कर, सुधीर गोळे, दीपक दाभाडे, अविनाश पवार, सतीश वानखडे, मिलिंद गोतमारे, निखिल पुरढे शेतकरी उपस्थित होते

