सचिन खांडेकर यांनी 11 वेळा रक्तदान करून दिली आदरांजली
उषा नाईक
विदर्भ संपादक
प्रबोधिनी न्युज
कारंजा- भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्थानिक शिक्षक क्लोलोनीतील बौध्द विहार येथे महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ व तरुण मित्र मंडळ अशोक नगर कारंजा याचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते माजी वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ देवरे,यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले,तरुण मित्र मंडळ अशोक नगर चे अध्यक्ष किशोर उके, प्रा. अशोक जाधव,बौध्द विहार समितीचे अध्यक्ष संजय खाडे, माळी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण बोळे,प्रा.मुकुंद खडसे आदींची उपस्थिती होती.
यावेळी कारंजा शहरातील अनेक तरुणांनी स्वयम् फुर्तीने रक्तदान करून आदरांजली अर्पण केली,यात केतन देशपांडे,धम्मापाल कुलकर्णी, मंगल सिंग,शेख सोनुभाई, अशोक चव्हाण, संतोष आसरे, सागर अंभोरे श्रीकांत बागडे, विनोद गणवीर, सचिन बागडे, किशोर उके, आदींनी अनेकदा रक्तदान करून आदरांजली अर्पण केली.यात विशेष म्हणजे सर्व समाज बाधवाणी सहभाग नोदवीला. रक्तदान शिबिरात शासकीय रक्तपेढी वाशीमचे डॉ स्वप्नील हाके, रक्त साठवणूक केंद्र जिल्हा उप रुग्णालय कारंजा डॉ.चंदन वासनिक ,रक्तपेढी वाशिम चे पिआरो सचिन दंदे,आशिष इंगळे,अक्षय नप्ते,संतोष ढोके आधिनी सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे निलेश मुंदे, विनोद गणवीर, मोनाली गणवीर, सागर अंभोरे यांचेसह तरुण मित्र मंडळ चे किशोर उके,उमेश गजभिये, सचिन खांडेकर, धम्मापल कुलकर्णी, सचिन गूळदे, रवींद्र भुसारे,विलास डांगरे मंगेश कुडवे,यांनी अथक परिश्रम घेतले शिबिराचा समारोप माजी गट विकास अधिकारी शालिकराम पडघान यांचे समारोपीय भाषणाने झाला.

