नावालाच आहे गुटखा “बंदी” या मध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची होते “चांंदी”

0
68

एफ.डी.ए.चा “विठुराया” गप्प का..??

कमलनगर ते शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री सुसाट

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हंडरगुळी- राज्यात बंदी असलेला गुटखा व सुंगधी जर्दा याची खेड्यापाड्यात खुल्लमखुल्लां विक्री होताना आम आदमीला दिसते. माञ संबंधित अन्न व औषध सुरक्षा FDA अधिकारी महाशयाला दिसत नाही.का?तसेच अन्न सुरक्षाधिकारी लातुर,यांची आर्थिक “चांदी” होते. म्हणुनच FDA अन्न व औषध खाते लातुरचा “विठुराया” या गोरख धंद्या ला मुक संमती देत असेल.अशी चर्चा जनतेतुन होत आहे.म्हणुन “असे रे कसे गुटखा बंदी; तुझे अन्न सुरक्षा अधिका-यानीच केले हसे” असे म्हणने चुक ठरु नये.कारण या धंद्यावर कारवाहीचे अधिकार असुनही अद्याप एकदा पण संबंधीत FDA च्या अधिका-यानी ह्या भागात कारवाही केल्याचे ज्ञात नाही. FDA च्या सं. अधिका-यात “दमखम” नाही. म्हणुनच कर्नाटक या पर राज्यातुन शिरुर ताजबंद या गावात राजरोसपने प्रतिबंधित असलेला गुटखा, सुंगधित तंबाखु,जर्दा याची वाहतूक व विक्री करणारे वाहन,गाडी सुसाटपणे धावते ते पण उदगीर शहर मार्गे कधी हाळी मार्गे तर हेर व कधी जळकोट मार्गे शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री करणारी गाडी विना अडथळा जाते. तसेच शिरुरचा गुटखा तस्कर हा कधी नंबरची तर कधी विनानंबरची गाडी मधून गुटख्याची तस्करी करतो. तसेच i.p.s.पोलीस अधिकारी निकेतन कदम हे जेवढे वर्षे लातुर जिल्ह्यात ड्यूटीवर होते.तो पर्यंत हा तस्कर गुटखा विकत नव्हता.कारण ip.s निकेतनजी कदम यांचा अवैध धंदेवाल्यांत “दरारा”च तसा होता.पण 15 दिवसापुर्वी i.p.s निकेतन कदम यांचा कार्यकाळ संपताच बदली झाली. व हा तस्कर पुन्हा गुटखा विकण्यासाठी “रेडी” झाला.व रोज लाखोंचा गुटखा सरेआमपणे विकत आहे.अशी चर्चा शिरुर ताजबंद सह हंडरगुळी परिसरात ऐकू येत आहे. तेंव्हा या गुटखा तस्करावर कारवाही करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी, लातुर हे “रेडी” आहेत.का.व संबंधित अन्न सुरक्षाधिकारी यांच्यात गुटखा तस्करावर कारवाई करण्याची ‘धमक’ आहे. का. असे प्रश्न जनतेतून चर्चीले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here