अचलपूरातील अवैध गुटखा साठ्यावर गुन्हे शाखेची धाड

0
81

चावल मंडी येथून ५ लक्ष ४३ हजाराचा माल जप्त

दै. विदर्भ केसरी ने चालविली होती बातम्यांची मालिका

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती – (अचलपूर) तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीला उधाण आले असून रात्रीच्या अंधारात चाललेल्या या खेळाला दै विदर्भ केसरी ने बातम्यांची मालिका चालवून चव्हाट्यावर आणले होते. एवढेच नव्हे तर ही दखल घेत गटखा माफीयावर कारवाई करीता शिवसेनेच्या वतीने अचलपूर उपविभागीय अधिकारी यांना घेराव सुद्धा करण्यात आला. याचाच परिणाम म्हणून काल स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण द्वारा अचलपूरात धाड टाकून अवैध गुटखा पोहोचविणा-या वाहनासह ५ लक्ष ४३ हजाराचा माल हस्तगत करण्यात आला.
माहितीनुसार अचलपूर पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली कि चावलमंडी, अचलपूर येथील दुकानात प्रतिबंधित असलेला गुटखा भरून असलेली बुलेरो पिकअप गाडी खाली होणार आहे. अशा खबरेवरून चावलमंडी, अचलपूर येथे पंचांसमक्ष रेड केली असता, आरोपी चे ताब्यातून प्रीमियम नजर गुटखा पाकीट 1424 नग,) नजर 9000 नावाचे गुटखा पाकीट 900 नग, एकूण कि.293,120 रु चा गुटखा, गुन्ह्यात वापरलेले वाहन बुलेरो पिकअप mh 12 gt 1544 कि.250,000 रु असा एकूण 543,120 रु चा माल मिळून आला. आरोपीकडून सदर माल जप्त करून आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कार्यवाही करीता आरोपीस पोलीस स्टेशन अचलपूर यांचे ताब्यात देण्यात आले. या घटनेत आरोपी नासिर उर्फ मुख्तार अहमद खान वय 56 वर्ष राहणार दुल्हा गेट अचलपूर, शेख इरफान शेख बुरहान वय 30 वर्ष रा. मोमीनपुरा अचलपूर यांना अटक करण्यात आली सदरची कार्यवाही किरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली API/ सचिन पवार,युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, सागर नाठे,हर्षद घुसे यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात गाजणार अवैध गुटखा- प्रितेव अवघड

विर मराठा योद्धा बाजीराव बल्लाळ पेशवे यांचे गुटखा पाऊच वरिल नावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असुन, अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे हेतुपूरस्कर डोळेझाक करित आहे. पण पोलिस प्रशासनाने मनावर घेतले तर महापुरुषांचा अपमान करणा-या अवैध गुटखा पाऊच निर्मात्यावर गुन्हा दाखल करावा. स्थानिक प्रशासनाने बाजीराव मस्तानी गुटखा पाऊच वर त्वरित प्रतिबंध न घातल्यास हिवाळी अधिवेशन मध्ये संबंधित मंत्रीच्या निदर्शनास आनुन देवू आणि वेळ उद्भवल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रितेश अवघड यांनी आमच्या प्रतिनीधीला भ्रमणध्वणी द्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here