माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले
ब्रम्हपुरी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
तालुक्यातील खेडमक्ता येथे जय जवान जय किसान नाट्य कला मंडळ, खेडमक्ता यांच्या वतीने चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा प्रस्तूत “टाकलेलं पोर” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आलं होते. या नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
या नाटकाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. राजेश कांबळे माजी जि.प. सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाला सहउद्घाटक म्हणून निलेश बनकर उपस्थित होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून दीक्षाताई भजनकर सरपंच खेडमक्ता, देवानंद सोनकुसरे पो.पा., देवाभाऊ खेडमक्ता, बाळू ठाकरे धान्य व्यापारी, किशोर काकडे, लेकराम सेलोकर, अशोक रामटेके, धनराज आळकिणे, सुरज सेलोटे, उल्लेखा गायकवाड ग्रा.प. सदस्या खेडमक्ता, डॉ. सुनंदा मेश्राम, भोजराज बारसागडे, सुनीता सावजकर ग्रा.प.सदस्या, मूखेश येनगुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, गावातखेड्यात आयोजित नाटके हि सांस्कृतिक आणि कलेला प्रोत्साहन देणारे एक अद्वितीय माध्यम आहे. या नाटकांमध्ये स्थानीय कलाकारांना अभिनय करण्याची मिळते आणि समुदायातील लोकांना मनोरंजनाचं सुवर्णसंधीत देतो. हे कार्यक्रम सामुदायिक सांस्कृतिक साकारात्मकतेचं वाढवितो आणि लोकांना एकत्र आनत असते. गावाला एकत्र आणण्यासाठी अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचा आनंद आहे.
खास मंडईनिमित्त जय जवान जय किसान नाट्य कला मंडळ, खेडमक्ता यांच्या वतीने चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा प्रस्तूत “टाकलेलं पोर” नाटकाचा खेडमक्ता येथील जनतेने आनंद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

