चिमुर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वान नंतर फार मोठी चळवळीत पोकळीक निर्माण झालेली आहे. विविध पक्ष राजकारण मीच बाबासाहेबांचा आहे हे सांगत फिरत आहेत, परंतु इथल्या एस सी, एस टी ओबीसी समाजाला सोबत घेऊन बहुजन समाज घडवावा, असे प्रतिपादन अॅड. मिलिंद मेश्राम यांनी केले. ते दीपकर बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष प्रेमीला पोपटे, भानुदास पोपटे, पदमा नागदेवते, अल्का डांगे, ममता घोंनमोडे, प्रतिभा पाटील, अजिक्य पोपटे, सचिन नगराळे, विवेक पोपटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुजाता फुलझले व गीता जगताप यांनी केले.

