सावली प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.रा.) शाखा सावली व लहुजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक ६ डिसेंबर २०२३ ला सकाळी १० वाजता मौजा पाथरी येथे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी ” कही हम भूल न जाये ” या अभियानातून पहिल्यांदाच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर नसते तर… या वक्तृत्व स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक प्रेम जरपोतवार यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक गजानन आलेवार, तृतीय पारितोषिक भूषण कोरेवार यांनी पटकावला. महीला गटातून प्रथम क्रमांक प्राजक्ता कोरगंदावार, व्दितीय क्रमांक अस्मिता लाटेलवार, तृतीय क्रमांक खुशबू इटकलवार हिने पटकावला. प्रेमने आपल्या यशाचे श्रेय आई- वडील, ताई, शिक्षक व मित्रपरिवाराला दिले आहे.

