शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल तालुक्यातील गाव टेकाडी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत महाराष्ट्र अंनिसचा प्रबोधनाचा कार्यक्रम देवनिल विद्यालयाचे मुख्याध्यापक सावरकर यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्पाचे राज्य सहकार्यवाह विलास निंभोरकर गडचिरोली, जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, सावली शाखा कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी चमत्कारिक प्रयोगांचे सादरीकरण करून अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष पी एम जाधव यांनी स्वयंअध्ययन परिक्षेबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला देवनील विद्यालयाचे शिक्षकविद्यार्थी व कर्मचारी यांची उपस्थिती होती असे देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष महा अंनिस यांनी कळविले आहे.

