बाबुपेठ मंडळात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी नांव नोंदणी

0
108

२ दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपुर प्रतींनिधी
प्रबोधिनी न्युज

मा.ना. सुधिर मुनगंटीवार, मंत्री – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात व अरुण तिखे यांच्या नियोजनांतर्गत बाबुपेठ दक्षिण मंडळात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नाव नोंदणी दोन दिवसीय शिबिराचे यशस्‍वी आयोजन करण्यात आले.

दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२३ रोजी १८ प्रकारच्‍या पारंपारिक कारागिरांना व्‍यवसायासाठी व्‍यवसाय प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्‍साहन देण्‍याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्‍वकर्मा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेची माहिती चंद्रपूर महानगर अंतर्गत देण्‍याकरिता दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये १४० लाभार्थ्यांची आँनलाईन नोंदणी करण्यात आली व २५० लाभार्थीचे ऑफलाईन नोंदणी करण्‍यात आली. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे महानगर संयोजक अरुण तिखे, भाजपा उपाध्यक्ष अँड. सुरेश तालेवार, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गन्नुवार, मंडळ अध्यक्ष संदिप आगलावे यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेविषयी विस्तृत माहिती दिली. दोन दिवसीय शिबिराचे यशस्वीतेकरिता मंडळ ज्येष्ठ पदाधिकारी दशरथ सोनकुसरे, महानगर भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडु, मारोती पारपेल्लीवार, पुंडलिक ऊरकुडे, रेखा ताई चन्ने, माजी नगरसेवक, प्रदिप किरमे, माजी नगरसेविका ज्योती गेडाम, कल्पना बगुलकर, शालु कन्नोजवार, रंजना ऊमाटे, अर्चना ऊरकुडे, आकाश ठुसे, पराग मलोडे, कुणाल गुंडावार, पवन ढवळे, राजेंद्र दागमवार, शांताराम भोयर, डॉ. प्रमोद रामटेके, नंदकिशोर बगुलकर, बबन दातारकर, भारत वैद्य, सुरज पिंपळशेडे, मंगेश तामगाडगे, संत रविदास महाराज सभागृह कमेटी पदाधिकारी इत्‍यादींनी कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता अथक परिश्रम घेतले.

अशाच पद्धतीचे आयोजन प्रत्येक क्षेत्र निहाय समाज बांधवाकारिता करण्यात येणार असून त्याचे नियोजन सुद्धा केले आहे. यातून जास्तीत जास्त समाजबांधवाना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ देण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल भाऊ पावडे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here