सरकारने जारी केले नवे नियम
निशा सोनवणे
कोकण विभाग संपादक
प्रबोधिनी न्युज
मुंबई : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही विमानाचे तिकीट बुक केले असेल आणि विमान कंपनीने ते रद्द केले किंवा उशीर केला तर आता काळजी करण्याची गरज नाही. विमान रद्द किंवा विलंब झाल्यास प्रवाशांचे हक्क सरकारने स्पष्ट केले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) नुकतेच प्रवासी उड्डाणांबाबत काही नियम जारी केले आहेत. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी या नियमांची माहिती दिली आहे.
पैसे परत करावे लागतील
व्ही. के. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, विमान रद्द झाल्यास विमान कंपनी एकतर दुसरे विमान देईल किंवा तिकिटाची संपूर्ण रक्कम परत करेल. एवढेच नाही तर विमान कंपनी प्रवाशांना अतिरिक्त भरपाईही देणार आहे. याशिवाय दुसऱ्या विमानाची वाट पाहत असताना त्यांना जेवण आणि अल्पोपहाराची सेवा द्यावी लागेल. पहिले विमान रद्द झाल्यानंतर कंपनी तुम्हाला दुसरे विमान देत असताना प्रवाशांना वाट पाहावी लागते. त्यामुळे त्यांना अन्न आणि अल्पोपाहार देण आवश्यक आहे.
प्रवाशांचे हक्क
प्रवाशाला दुसऱ्या फ्लाइटच्या तिकीटाची किंवा हॉटेलमध्ये राहण्याची आणि वाहतुकीची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. विमान कंपनीच्या नियंत्रणाबाहेरील असाधारण परिस्थितीमुळे उड्डाण रद्द झाले किंवा उशीर झाला, तर त्या प्रकरणात विमान कंपनीला पैसे द्यावे लागणार नाहीत. उड्डाण विलंब किंवा रद्द झाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि या संदर्भात प्रवाशांचे आणि कंपनीचे अधिकार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या वेबसाइटवर स्पष्ट केले आहेत.
1. 2 तास उशीर : विमानाला 2 तास उशीर झाल्यास प्रवाशांना मोफत नाश्ता दिला जातो. फ्लाइटचा ब्लॉक कालावधी 2.5 ते 5 तासांच्या दरम्यान असेल आणि विलंब 3 तासांपेक्षा जास्त असेल तर प्रवाशांना नाश्ता दिला जाईल.
2. 6 तासांचा विलंब : विमानाला 6 तासांचा विलंब झाल्यास विमान कंपनीने उड्डाण वेळेच्या 24 तास आधी प्रवाशांना सूचना देणे किंवा कळवणे आवश्यक आहे. इतर फ्लाइटचा पर्याय द्यावा लागेल.
3. उड्डाण रद्द करणे : विमान वाहतूक मंत्रालयाच्या नियमानुसार, विमान कंपनीला त्या ग्राहकांना दुसरे विमान द्यावे लागेल किंवा पूर्ण रक्कम परत करावी लागेल. विमान दोन आठवडे आधी रद्द केल्यास असे होईल.

