एनआयए ची अचलपुरात शिक्षकाच्या घरी छापेमारी एक युवकाला घेतले चौकशीसाठी ताब्यात,कारवाईमुळे खळबळ

0
68

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अचलपूरातील एका शिक्षकाच्या घरावर छापा घालून एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे या कारवाहीमुळे अचलपुरात खळबळ उडाली होती एनआयएच्या पथकाने सोमवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई केली या छापेमारीची यंत्रणेकडून कामालीची गुप्तता बाळगली होती यावेळी स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

अचलपूर येथील अकबरी चौक परिसरात एनआयएचे पथक रात्री ३ वाजेच्या सुमारास पोहचले त्यांनी एका घरात पोहचून युवकाची चौकशी सुरू केली या युवकाच्या हालचालींवर राष्ट्रीय तपास यंत्रणा मागील काही महिन्यांपासून लक्ष ठेवून होती संबंधित युवक नागपूर येथे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे या युवकाची चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक अचलपूर येथे पोहचले अचलपूर आणि सरमरसपूरा पोलिसांचे संरक्षण घेऊन त्यांनी अकबरी चौक परिसरातील एका घरावर छापा घातला यावेळी पोलिसांच्या सुमारे १५ वाहनांचा ताफा पोहचला होता.

छापेमारीबाबत मात्र एनआयएने कोणताही अधिकृत तपशील दिलेला नाही स्थानिक पोलिसांनीही याबाबत गुप्तता पाळली आहे एनआयएसारखी तपास यंत्रणा अचलपुरात छापेमारी करण्यासाठी आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.

अचलपूर शहरात एनआयए कडून छापेमारी करण्यात आली मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सदर कारवाहीची माहिती संबधित तपास यंत्रणाच देऊ शकते.
सुरेंद्र बेलखेडे,पोलीस निरीक्षक अचलपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here