भारतीय संविधानाने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे संरक्षण होणे गरजेचे – डॉ. नामदेव किरसान.

0
66

सोनाली कोसे
तालुका प्रतिनिधी
नागभीड

नागभीड- दिनांक १६/१२/२०२३ रोजी मौजा मेंढा (किरमीटी) ता. नागभीड, जि. चंद्रपूर येथे सार्वजनिक नाट्य कला मंडळ मेंढा (कि.) च्या वतीने “जनावर” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, गडचिरोली जिल्हा परिवहन सेल अध्यक्ष रूपेश टिकले उपस्थित होते.

उदघाट्न सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शक करतांना महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमुर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी भारतीय संविधानातील तरतुदींची शासनकर्त्याकडूनच कशी पायमल्ली व अवहेलना केली जाते याचे दाखले देऊन सांगितले की भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सारखी संधी व सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाची तरतूद असतांना सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण करून अप्रत्यक्षपणे नोकरीतील आरक्षण संपविण्याचे काम केले जात आहे. मुठभर पुंजी पतीच्या संपत्तीत कितीतरी पटीने वाढ होत आहे, परंतु शेतकरी व सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घट होत आहे. गरीब व श्रीमंत यातील दरी वाढत चाललेली आहे, हे सामाजिक व आर्थिक न्याय नाकारण्यासारखे आहे. देशातील साधन संपत्तीचे वाटप सर्वांना सारखे करण्याची गरज असतांना ती साधन संपत्ती मुठभर पूजीपतींकडे केंद्रित होत आहे. हा आर्थिक अन्याय लोक सहन करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या महागाई व बेरोजगारीमुळे लोकं त्रस्त आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ न होता महागाईमुळे उत्पादन खर्चात मात्र वाढ झालेली आहे. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व जनसामान्यांना सन्मानाने जीवन जगणे कठीण झालेले आहे. अशा रीतीने संविधानातील तरतुदींची अवहेलना करून शासन चालविले जात आहे. अशा रीतीने संवैधानिक मानवी हक्कांची हेतुपुरस्सर अवहेलना केली जात आहे. संविधानाच्या तरतुदींचे खऱ्या अर्थाने संरक्षण करायचे असेल तर अशा पुंजीपती धार्जिण्या सरकारला मतदानाच्या माध्यमातून सत्तेतून बडतर्फ करा. असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here