अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती : अमरावती तालुक्यातील लोकसंखेने मोठे असलेले (शिराळा) गावामध्येय सुविधांचा अभाव आहे. त्यातील एक असुविधा असलेली नाल्याजवळ ची स्मशानभुमित गेल्या पाच वर्षापासून लाईट नाही व स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे क्रॉकरीट रस्याची व लाईटची लावण्याची मागणी शिराळा ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात येथे जाण्यासाठी लागणारा रस्ता नसल्यामुळे मैय्यत नेण्यासाठी कमालीची कसरत करावी लागते त्याशिवाय या स्मशानभूमीत लाईटची कोणतीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी मय्यत नेतांनी अंधारात मय्यत नेतांनी अनेक समस्येचा सामना करावा लागतो शिवाय स्मशानात सुध्दा लाईटची व्यवस्था नाही तरी या स्मशानभूमीत लाईटची व्यवस्था व रस्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

