अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बाॅल सामनेचे उदघाटन
रुपाली रामटेके
विशेष जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली
भामरागड : स्व.श्री.सीताराम हरिदास सडमेक (कामगार)स्मृती प्रित्यर्थ जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड द्वारा आयोजित येथे भव्य टेनिस बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज या स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजय मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.
या स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका यांच्या कडून प्रथम पारितोषिक 71,000/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक मा.सर्व अधिकारी वर्ग भामरागड तर्फे 51,000/- तृतीय पारितोषिक जय श्रीराम युवा क्रिकेट मंडळ भामरागड तर्फे कडून 21,000/-असे या स्पर्धेसाठी तीन पारितोषिक देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामरागडचे न.पं.नगराध्यक्षा रामबाई कोमटी महाका,नरोटी, कृ.उ.बा.स. संचालक दादू, दिलीप उईकेनगरसेवक भामरागड, बालू बोगामी कॉग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,तपेश हलदार,आशिष सुपी, शामराव येरकलवार, मलेश तलांडी सरपंच मडवेली, नंदू सरपंच पारायनार, माजी माजी सरपंच पल्ली, बाळू पोरेड्डीवार, कु.हीचामी सरपंच आरेवाडा, डोलेश मडावी माजी सरपंच कंदोळी, किशोर कडंगा सरपंच होड्री, नगरसेवक, निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, अहेरी प्रशांत गोडसेलवार राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

