रविंद्र मैद
तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी
ब्रम्हपुरी- दि.19 डिसेंबर 2023 रोजी बोडधा (हळदा) ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे शिवशक्ती नाट्य कला मंडळ बोडधाच्या वतीने आयोजित “धागा…. एक बंध प्रेमाचा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढण्यास मोदी सरकारला जबाबदार धरत, त्यांनी आश्वासन दिल्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ केली नाही, परंतु त्यांनी धानाला अत्यंत कमी हमीभाव जाहीर केल्यामुळे राज्य शासनाने प्रति हेक्टर ऐवजी प्रती क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उद्घाटक माजी जि प सदस्य प्रमोद चिमूरकर, सह उद्घाटक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि प सदस्य डॉ. प्रा. राजेश कांबळे, सरपंच मनीषा झोडगे, रुपेश ठाकरे, माजी पोलीस पाटील मंगलदास पाटील ठाकरे, जे के ठाकरे, सरपंच उमेश धोटे, दीपप्रज्वलक भाकपा नेते विनोद झोडगे, दिनेश पाटील ठाकरे, कृ उ बा संचालक किशोर राऊत, गडचिरोली काँग्रेस अ जा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, नेताजी गावतुरे, दीपक पाटील ठाकरे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

