जया भगत
यवतमाळ प्रतिनिधी
ऐकीकडे मागास राज्य म्हणून अवहेलना केली जाणाऱ्या बिहार ने 6 महिन्यात 100000+ शिक्षकांची भरती करून नियुक्तीपत्रे दिली.. तर दुसरीकडे प्रगत म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्र राज्याला 10 महिने होऊन देखील 30000 जागांची भरती करण्यात यश आलेलं नाही. महाराष्टात शिक्षणा पेक्षा जात धर्म अशा नको त्या विषयाला दुजोरा दिला जातो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे तरी सुद्धा शासन व प्रशासन वारंवार शिक्षकभरतीला लांबणीवर टाकून सामान्य अभियोग्यताधारकांच्या भावनांशी खेळत आहे. व आतातर 30% जागा कपातीचा अन्यायकारक निर्णय घेतला असून त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फटका बसणार आहे…भावी शिक्षकांनी किती मानसिक त्रास सहन करावा…?? असा प्रश्न निर्मान झाला आहे तरी 30% जागा कपाती करूण भावी शिक्षकावर अन्याय होत आहे महाराष्ट्रात सुशिक्षित तरुण बेरोजगर वाढच होत आहे…

