पंढरपूरच्या विठ्ठल माऊलींची पालखी शोभायात्रा
गुरुदेव सेवा मंडळाचे आयोजन
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळा गिरगाव येथे पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे उद्घाटन मा.अतुलजी गण्यारपवार सहकार नेते तथा जिल्हाध्यक्ष रा. काँ.पा ,सहउटघाटक पांडुरंजी जाधव संचालक जि.म बँक. चंद्रपूर अध्यक्ष,मोरेश्वर झाडे गुरूदेव प्रचारक ,प्रमुख मार्गदर्शक रमेश बोरकर उपसभापती कु.उ. बा. स. नागभिड ,संजय तोटावार संचालक जि.म.बँक. चंद्रपूर, खोजरामजी मरसकोलहे माजी जि.प. सदस्य , प्रफुलजी खापर्डे माजी सभापती प.स., अशोकरावजी गायकवाड माजी कुषी सभापती चंद्रपूर, सरपंच गिता बोरकर , मायाताई कामडी मुख्यधयापिका जि.प.शाळा गिरगाव, आकाश पगाडे सामाजिक कार्यकर्ते, घनश्याम गहाने,प्रशांत गायकवाड,गणपत सहारे, मोतीरामजी मोहुरले ,सुनिल सोनवाने, महेश गिरडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाअंतर्गत ध्वजारोहण घटस्थापना आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर साई ब्लड बँक धंतोली नागपूर गुरांचे पशूरोग निदान व उपचार शिबिर इत्यादी घेण्यात आले.विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा, तिन पायाची दौंड ,दोरी वरील उड्या, निबंध स्पर्धा अशा प्रकारे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जि.प शाळा तसेच सा.फु.वि.गिरगाव येथील विद्यार्थीकडुन भरभरुन प्रतिसाद मिळाला. वर्ग 12वी प्रथम नेहा मादाळे वर्ग 10वी प्रथम स्नेहल गायकवाड तसेच मा.रमेश बोरकर शिक्षक सा.फु.वि गिरगाव याना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन लाजुळकर महाराज यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ह.भ.प.लाजुळकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमला गावातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी सतिशजी वारजुरकर उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ तथा माजी जिल्हाध्यक्ष जि.प ,मंगेशजी भोयर ठाणेदार साहेब तळोधी, विनोद बोरकर अध्यक्ष श्री. लक्ष्मी पतसंस्था गिरगाव , अशोक गायकवाड माजी कृषी सभापती चंद्रपूर , पुरूषोत्तम बोरकर ,शरद सोनवाने याची उपस्थिती विलासराव बोरकर सर ग्रामगीताचारय नवरगाव याचे विशेष मार्गदर्शन लाभले. होती.महिला मेळावा घेण्यात आला यावेळी अध्यक्ष कविता सोनवाने शिक्षिका भारत वि.नवरगाव मार्गदर्शक मंगला मोहुरले, गिता बोरकर यावेळी व्यासपीठावर इतर महिलाची उपस्थिती होती.
समारोपिय कार्यक्रमाला चिमुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.बटीभाऊ भागडीया उपस्थित होते. यावेळी गुरूदेव सेवा मंडळाच्या सभागृह बांधकामांचे भुमिपुजन करण्यात आले.यावेळी नितीन जैस्वाल रमेश बोरकर भैय्याजी गिरडकर मनोहर गहाने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.दुपारी 2 वाजता गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले.ह.भ.प.लाजुळकर महाराज यांच्या हस्ते गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले.4.58 मि.व राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या मौन श्रद्धांजली व सर्व धर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवंदनाने व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता अध्यक्ष मनोहरराव गहाने, जिवन बोरकर , सुनिल सोनवाने, गोपाल गहाने ,निलकंठ बोरकर,, किशोर सोनवाणे, अजय अरतपहारे , रामदास राऊत,कृष्णाजी सोनवाने, राजकुमार मादाळे , अरविंद ठेरकर, दिवाकर पिपळवार, दिलीप मेश्राम, देवानद गहाने ,महेश गिरडकर, दादाजी जिवतोडे, मनोहर चावरे तसेच गावातील सर्व ग्रामवासी बाहेरगावाहून आलेली सर्व भाविक भक्तताची यावेळी उपस्थिती होती.विकास गोडाणे ग्रा.प सदस्य गिरगाव यांच्या कडून ग्रामगीताचे वितरण गुरुदेव सेवा मंडळाला करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रमेश बोरकर सर नवरगाव तर आभार होमराज बोरकर यांनी केले.

