कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला क्रासकंट्रीस्पर्धा १०की.मी. धावणे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे नुकताच आयोजित करण्यात आली होती. प्रथम पुरुष स्पर्धेला ठिक ७.२० वाजता मा.डा . सतीश चिंतावार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात दिली. त्यानंतर महिला स्पर्धेला ठिक ७-२५ वाजता मा.अरविंदभाऊ जैस्वाल सचिव विद्याप्रसारक संस्था सिंदेवाही यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात दिली.
यास्पर्धेमध्ये १७ महाविद्यालयाचे ५४ पुरुष स्पर्धक तर ९ महाविद्यालयाचे ३३ महिला स्पर्धक यांनी भाग घेतला या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक गुलसन आर माहुरकर गोविंद प्रभू महाविद्यालय तळोधी,द्वितीय क्रमांक सुमित एस. श्रीवासकर एस.पी.महाविदयालय चंद्रपूर ,तृतीय क्रमांक रीतीक डी.धोडरे कर्मवीर महाविद्यालय मुलं याप्रमाणे पुरुष स्पर्धा रंगली तर महिला गटात प्रथम क्रमांक आँचल रमेश कडुकर एफ.ई.एस. महाविदयालय चंद्रपूर, द्वितीय क्रमांक वैशाली विलास मालेकर एफ. ई.एस.महाविदयालय चंद्रपूर तृतीय क्रमांक दिक्षा व्हि.चौके एम.जी.महाविदयालय आरमोरी या प्रमाणे स्पर्धक १० कि.मी. अंतर पुर्ण करुन स्पर्धेला यशस्वी ठरले आहेत.यास्पर्धेला यशस्वी करण्यासाठी डॉ. लेमदेव नागलवाडे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ. राजेश डहारे, डॉ. रिजवान शेख, प्राध्यापक अमित उके, प्राध्यापक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी,आजी व माजी विद्यार्थी विद्यार्थीनी यात आशिष चिंतावार, देवेंद्र मंडलवार, अजय नेटिनकर, प्रविण मोहुर्ले, महेश मंडलवार, सारंग गळमळे ,अब्रार खान, आणि करीना, गुंजन, आकांक्षा इत्यादी माजी ,आजी विद्यार्थी विद्यार्थीनी सहकार्य केले. तसेच नगरपंचायत सिंदेवाही यांनी रुग्णवाहिका सेवा देवुन सहकार्य केले,मा.ठाणेदार साहेब यांनी ट्रॅफिक पोलिसांची मदत दिली.यास्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्याचे आयोजकांनी आभार मानले.

