समंधित सर्वेसर्व असणाऱ्या अधिकाऱ्यांना निवेदनात प्रश्न उत्तराची मागणी (कार्यवाही का होत नाही)- जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे
पावसाळ्यात घरे पाण्याखाली येण्याची शक्यत
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर : शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जनजीवन विस्कळीत होते अनधिकृत बांधकामामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. आज नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याने शिरकाव केल्याने पूरपरिस्थिती व नागरिकांचे मोठे नुकसान पाहायला मिळते.
चंद्रपूर शहरानजीक असलेल्या मौजा कोसारा येथील श्री. हंस भक्ती आश्रम जवळ पाऊणकर ले आऊट येथील रस्त्यावर असलेल्या इरई नदीलागत असलेल्या पुलाखालून पाणी सुरळीत वाहत होते व पाण्याचा योग्य निचरा देखील होत होता .परंतु सदर नाल्या लगत चौधरी नामक व्यक्तीने काही दिवासा आधी अनधिकृत रित्या 10 फूट उंचीची काँक्रीट भिंत बांधल्याने पावसात सदर भागातील नागरिकांच्या घरात नाल्यातील पाण्याचा शिरकाव होऊन मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता भागातील नागरीकातून व्यक्त केली जात आहे.
सदर गंभीर बाब लक्षात घेत अनधिकृत केलेले बांधकाम तात्काळ कार्यवाही करत या भागातील नागरिकांना समोर उभारणाऱ्या समस्यानं पासून बचाव करण्या करीता चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुलदीप चंदनखेडे व पदाधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात व त्वरित सदर विषयावर तोडगा काढावा या साठी विनंती देखील केली. अणि या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत या निवेदनाची तत्काळ दखल जर घेतली जाणार नाही तर येत्या 7 दिवसात मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे आणि समत्त मनसे परिवार या वाहणाऱ्या पाण्याची रोख करणाऱ्या पुलियातील पाणी रोखणाऱ्या चौधरी यांना चौधरी चा चांद दाखऊन पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून देणार अणि त्यांनी सुधा मार्ग मोकळा झाला नाही तर मग मनसे आहेस त्यांच्या स्टाईल ला जोपासणारी मनसे असा इशारा सुद्धा दिला त्या वेळेस उपस्थित मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, जिल्हा अध्यक्ष व्यापारी सेना महेश शास्त्रकार,जिल्हा अध्यक्ष वाहतूक सेना महेश वासलवार,जिल्हा अध्यक्ष सुनिल भाऊ गुडे, जिल्हा सचिन किशोर भाऊ मडगूलवार,तालुका अधक्ष प्रकाश नागरकार, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूर्क्याल, तालुका सचिव करन नायर, तालुका उपाध्यक्ष मयुर मदनकर, कोसारा अध्यक्ष शुभम वांढरे, जनहित कक्ष सचिव मंगेश धोटे, कामगार अध्यक्ष अक्षय चौधरी,प्रफुल कुचनकर, शिवाजी कडुकर, नितेश शेंडे, भुषण अंबादे, अक्षय काकडे आदी मनसैनिक अणि समस्त कोसारा गावकरी तसेच संगदिप जांभूळकर,धर्मेंद्र किनाके, नारायण गौरकार, विजय धागी, ईश्वर पांघटे, ओम जी शर्मा उपस्थित होते.

