कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
विजय वडेट्टीवार फॅन्स क्लब नवरगांव द्वारा आयोजीत स्व.बालुभाऊ लोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रात्रकालीन प्रो. कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन मा.शिवानी वडेट्टीवार सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या हस्ते संप्पन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.रमाकांत लोधे, स्वप्नील कावळे नगराध्यक्ष सिंदेवाही, स्वातीताई लोणकर ग्रा.पं.सदस्या नवरगाव, सुशांत बोडणे शहरअध्यक्ष काँग्रेस कमिटी नवरगांव, राहुल बोडणे सरपंच नवरगांव,दादाजी चनबनवार तं.मु.स.अध्यक्ष नवरगांव,निक्कु भैसारे सिंदेवाही,शांत बहीरवार काँग्रेस सोशल मिडीया समन्वयक,पवन जैस्वाल ग्रा.पं सदस्य, श्रीकांत हेडावू ग्रा.पं.सदस्य,संजय सोनकुसरे, सुभाष शिंदे,सज्जन तेल्कापल्लीवार सर,दिवाकर दुधकुरे, जितु डुंबरे, धनेश वंजारी, अतुल शेंडे ,चंदू चौधरी,प्रणव गायकवाड तथा या कार्यक्रमाचे संचालन मंगेश मेश्राम व आभार तेल्कापल्लीवार यांनी केले. या कार्यक्रमाला नवरगांव ग्रामवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

