अंगणवाडी सेविका कडून ग्रामपंचायत गुडशेला ला निवेदन

0
77

श्रीकांत राजपंगे
तालुका प्रतिनिधी,जीवती

जिवती दि.३०/१२/२०२३ ला अंगणवाडी सेविका केंद्र गोंडगुडा, कोलंमगुडा, लाभांनगुडा, गुडशेला येथील अंगणवाडी सेविका यांनी ४ डिसेंबर २०२३ पासुन बेमुदत अंदोलन सुरु आहे त्याच दरम्यान सरकार ने नवीन जी.आर काढण्यात आला आहे कि ग्रामपंचायत तर्फे एक महिला निवडून तिच्या हाते पोषण आहार वाटप करावा हा जी आर काढण्यात आला होता परंतु सर्व अंगणवाडी सेविकांनी मिळून ग्रामपंचायत ला याचना केली कि आमच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत कृपया कोणत्याही गटाला किंवा कोणती महिला कार्यकारी म्हणून नियुक्ती करू नका असे निवेदन ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, सचिव, यांना अंगणवाडी सेविका कडून ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले.
निवेदन घेत असताना सरपंच व सदस्य व सचिव यांनी त्याच्या या निवेदनाला पाठींबा दिला व निवेदन स्वीकारले. त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका श्रीमती. प्रेमकला राजपंगे, बालिका राजपंगे, सुरेखा गायकवाड, चित्रकला मोरे, व मदतनीस. भामाबाई मोरे, संगीता हरगिले, कविता गायकवाड, नीलबाई रायसिडाम व ग्रामपंचायत मधील सरपंच जलपत मडावी, सदस्य प्रेम केसरे व ग्रामपंचायत सचिव लामगे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here