सामाजिक कार्यकर्त्यांनी घडविले माणुसकीचे दर्शन
अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अचलपूर- माणुसकी हरवत चाललेल्या सध्याच्या युगात भूतदयेचा प्रत्यय देणारी ही घटना घडली त्यामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. अचलपूर शहरातील हिरापुरा भागात झाडावरून उडी मारत असताना विजेचा शॉक लागून या वानराचा मृत्यू झाला त्यानंतर हिरापुरा परिसरातील सामजिक कार्यकर्त्यांनी मृत वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
अचलपूर शहरातील हिरापुरा भागात ख्रिसमस दिनाच्या दिवशी वानरांची झुंड इमारतीवर उडी मारत असताना वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून ते खाली पडले त्यावेळी सोबत असलेले वानर मदतीसाठी धावले मात्र वानर उठत नसल्याचे पाहून उपस्थित आक्रोश करू लागले याचवेळी घटनास्थळी परिसरात उपस्थित असलेले गावकरीही वानराच्या मदतीला धावले परंतु वानराला वाचवण्यात अपयश आले परिसरात वानराचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि लोकांनी एकच गर्दी केली त्यानंतर हिरापुरा परिसरातील हनुमान भक्तांनी या वानरावर वाजत-गाजत अंत्यसंस्कार करणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर मृत वानराचा दर्शनासाठी लोक जमू लागले टोपी घातलेले आणि गुलाल लावलेल्या वानराला एका सजवलेल्या खुर्चीवर बसवण्यात आलं आणि हनुमान भक्तांनी अंत्ययात्रा काढली आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यविधीसाठी परिसरातील गजू गोबाळे,रमेश फुकट,अमोल फुकट,गोलू कळसकर,दिलीप फुकट,दिलीप गोबले,बंडू तायडे,राजू तायडे,बबलू जडिये,गोलू गुप्ता,मंत्री अकोलकर,ऋषी भुस्कडे,अमित अकोलकर,राजू गोबाले,धनराज चरपे,भूषण तायडे,नितीन तायडे,आकाश फुकट,विशाल राऊत,ओम घाते,गोपाल तायडे,अभय गोबाले,अत्रव देंडव,ओम तायडे,लकन डिके,सोहम ठाकूर उपस्थित होते.

