प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आंबेगाव – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, सुरेश मोहिते साहेब (महाराष्ट्र सरचिटणीस) व प्रोफेसर राज आटकोरे सर (महाराष्ट्र प्रवक्ते व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक) यांच्या आदेशानुसार दे आंबेगाव तालुक्यातील वळती गाव येथील रहिवासी व वंचित बहुजन आघाडी केंद्र कार्यालय बेलाड पियर मुंबई ऑफिस बॉय कर्मचारी संदीप ईश्वर मिरके यांच्या मुलगा दिवंगत.आदेश संदीप मिरके यांच्या हत्याप्रकरणी तात्काळ चौकशी व्हावी. ९/०८/२०२३ रोजी काही गुंड प्रवृत्तीचे लोक मिरके परिवार यांच्या घरावर दगडफेक करून लाता मारून, रात्री ११:३० वाजता प्रकरण होऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात नाही आली. कारण या प्रकाराला सहा महिने होऊन गेले आणि कोणतेही चौकशी झाली नाही असं दिसून येते व सोबत असलेले मित्र हे मोकट्याने फिरत आहेत संदीप मिरके आणि संगीता मिरके यांच्या संशयस्पद निदर्शनात असे आले आहे सहा महिन्यापूर्वी दिवंगत आदेश संदीप मिरके यांनी स्वतः घाबरून त्यांची आई संगीता मिरके यांना सांगण्यात आलं होतं की “मम्मी त्या मंगेश लोखंडे सांगतोय की चोरीच्या मॅटरमध्ये माझं नाव सुद्धा आकाश शेवाळे आणि यश शेवाळे बरोबर आला आहे अशी माहिती दिवंगत आदेश मिरके यांनी त्यांची आई संगीता मिरके यांना दिली होती. त्या भीतीने तोचोरीच्या प्रकारामध्ये काही लोक निदर्शनात आले असून, दिवंगत आदेश संदीप मिरके यांच्या सोबत 24 तास असणारे मित्र म्हणजे १) आकाश शेवाळे २) यश शेवाळे, यांच्यासोबत दिवस रात्र असताना त्यांच्यामध्ये काही खाजगी विषय व्हायचे व रात्रीचे घरी नसून रातभर हे बाहेर असायचे व यांच्या काही खाजगी विषय आदेश संदीप मिर्के यांना माहिती होते परंतु काही खाजगी विषय मध्ये आदेश संदीप मिर्के यांनी हात काढून घेतल्यामुळे आकाश शेवाळे आणि यश शेवाळे एकटे पडले व खाजगी विषय कोणालाही समजता कामा नये म्हणून आदेश संदीप मिरके यांना विष पाजण्यात आलं असे निदर्शनामध्ये येत आहे. तरी मिरके कुटुंब यांना जीवाला धोका आहे असं संशयस्पद येत आहे, तरी मिरके परिवार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर यांचे जबाबदार आकाश शेवाळे आणि यश शेवाळे, असेल. आपण या तक्रारीची सखोल चौकशी करून मिरके परिवार यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा. असे निवेदन देऊन मंचर पोलीस ठाणे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदिप गौतम साळवे (नवी मुंबई निरक्षक) पंकज सरोदे (तालुका उपाध्यक्ष), दिपालीताई साबळे (तालुका अध्यक्षा), रतन साबळे (सदस्य), मिरके कुटुंब उपस्थित होते.

